वैभव कळस
म्हसळा : तालुक्यातील आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत मांदाटणेची स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत राज्यस्तरीय समितीकडून पडताळणी करण्यात आली. मांदाटणे ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, कोरोनामुक्त गाव पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार अश्याप्रकारे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायतचे तरुण सरपंच चंदू पवार, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आणी ग्रामस्थ यांच्या मेहनतीमुळे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.
विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबविले असून गावाची संपूर्ण स्वच्छता उत्कृष्ठपणे राबविली असल्याने कमिटीकडून ग्रामस्थांचे कौतुक करण्यात आले. या कमिटीमध्ये कमिटी प्रमुख सत्यजित देशमुख (औरंगाबाद), संवाद तज्ज्ञ संजय वाघ, समाजशास्त्रज्ञ् वैशाली जगताप, सतिश रहाणे, सुनील माळी, आनंद धीवर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी. एन. दिघीकर यांचा समावेश होता. याप्रसंगी सरपंच चंदू पवार, माजी सरपंच श्रीपत मनवे, माजी सरपंच राजाराम धुमाळ, प्रदिप पवार, राजाराम दिवेकर, प्रकाश लाड, अशोक खरपुडे, सूर्यकांत रिकामे, अनिल बांद्रे, शैलेश ढवळे, नीता पवार, धनश्री मुंडे, शुभांगी शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय सोनवणे यांनी केले.