• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे अवेटी आदिवासी वाडीवर शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByEditor

Aug 13, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील कुर्डुस भागातील अवेटी येथील आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांना सोमवार, दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सक्षम एज्युकेशन सोसायटी व वनवासी आश्रम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी तुळपुळे मॅडम यांनी वनवासी आश्रम संस्थेच्या प्रवासाची विस्तृत माहिती दिली. सक्षमचे खजिनदार योगेश पवार यांनी लहान मुलांना विविध खेळाच्या माध्यमातून हसवत कार्यक्रमात रंग भरले तर प्रतिम सुतार यांनी आपल्या मधुर वाणीतून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शार्दूल काठे यांनी मुलांशी संवाद साधताना अभ्यासाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच भविष्यात सक्षम एज्युकेशन सोसायटी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करू शकते याबद्दल माहिती दिली. सदर शैक्षणिक साहित्याचे वाटप अनुराधा वेलणकर-दातार यांच्या आर्थिक मदतीतून करण्यात आले, तर संदीप कडुकर यांच्या मदतीने खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे पूजा पाटील सुतार, प्रसन्न ठाकूर, किसन गायकवाड, राम कदम, विशाल आमले, ओमकार आमले, वासुदेव आमले, सुवर्णा आमले आणि सागर तरंगे उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!