विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी येथील सावनी नितीन भोसले ही राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असुन या यशाबद्दल तीचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
चिंचवली तर्फे दिवाळी सारख्या खेडेगावातील सावनी भोसले ही राज्यात पाचवी तर रायगड जिल्ह्यात पहिली आली असुन आम्ही खेडेगावातील मुलीही कुठे कमी नाही असे या मुलीनी सिद्ध करून दाखविले आहे. सावनी ही इयत्ता दुसरीमध्ये शिकत असुन अतिशय लहान वयात तीने हे यश संपादीत केले असुन तिला तीचे शिक्षक हिना सौदागर, रुबिना पठाण, विजय भोसले व तीची आई रोहिणी भोसले, वडील नितीन भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल कोलाड हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शिरीष येरुणकर, संदीप भोसले तसेच चिंचवली तर्फे दिवाळीचे सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मंडळ यांनी सावनी भोसले हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.