विनायक पाटील
पेण : समाजातील गोरगरीब घटकांसाठी सदैव कार्य करण्यासाठी व समाजातील अंधश्रद्धा, स्त्रीशशक्तीकरण, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा अनेक निगडित गोष्टींना न्याय देण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या तिरंगा फाउंडेशन पेणच्या अध्यक्षपदी अविनाश पोसूराम पाटील (तरणखोप) तर सचिवपदी रमेश नथुराम पाटील (बळवली) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
तिरंगा फाउंडेशनच्या नुकत्याच झालेल्या मीटिंगमध्ये उपाध्यक्षपदी वासुदेव विठू म्हात्रे (कासू), खजिनदारपदी अनंत पांडुरंग पाटील (खरोशी), संचालकपदी हिरामण घरत (खारपाडा), किसन पाटील (जिते), कमलाकर पाटील (आंबिवली), लीलाधर म्हात्रे (जिते), महिला प्रमुखपदी पूजा प्रकाश घरत, शेवंता संजय गावंड (दुरशेत), अपर्णा हर्षद पाटील (कासू) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले की, तिरंगा फाउंडेशन हे सदैव समाजासाठी काम करत राहील, जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यास अग्रस्थानी राहील, समाजातील अंधश्रद्धा, स्त्रीशशक्तीकरण, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा अनेक गोष्टींना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न करेल. या प्रसंगी इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तिरंगा फाउंडेशनचे सभासद कुसुम गावंड, वासुदेव पाटील, ए.पी.पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश घरत, संजय गावंड, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.