• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाविरोधात पेणमध्ये निषेध

ByEditor

Aug 25, 2024

निषेध रॅलीमध्ये शेकडो हिंदू बांधव उपस्थित

विनायक पाटील
पेण :
बांगलादेशातील हिंदू बांधवांवर अत्‍याचार होत आहेत. त्‍याचा निषेध करण्यासाठी आज पेणमध्ये हिंदू संघटनांच्यावतीने निषेध रॅली काढण्यात आली. शहरातील कोतवाल चौक ते बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत घोषणा देत संपूर्ण पेण शहरातून रॅली काढण्यात आली. या निषेध रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित राहून बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला. निषेध रॅलीमध्ये शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या फेरीवेळी ‘बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकला’, ‘हिंदूवरील अत्‍याचार सहन करणार नाही’ अशा घोषणा देण्यात आल्‍या. यावेळी पेण शहरात आणि नाक्यांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच निषेधावेळी पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा सज्‍ज होता. या निषेध रॅलीमध्ये मंगल पाटील, ॲड. गणेश म्हात्रे, भास्कर पाटील, भोपतराव महाराज, महेश पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील, अरुण भोईर आदींसह हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी प्रांत कार्यालय अधिकारी अरुण म्हात्रे यांना बांगलादेशातील होत असलेल्या अन्यायाबद्दल निवेदन सादर करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!