• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का!

ByEditor

Aug 28, 2024

जसखारच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांचा अपील अर्ज कोकण आयुक्तांनी फेटाळला

सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड

विठ्ठल ममताबादे
उरण :
तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी जसखार ग्रामपंचायत ही शिवसेना ठाकरे गटाकडे होती. परंतु, ठाकरे गटाच्या सरपंच काशिबाई ठाकूर यांचे पद हे शासकीय जागेत केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिनांक १९/७/२०२४ रोजी अपात्र केले होते. परंतु, काशीबाई ठाकूर यांनी मा. कोकण आयुक्त यांच्याकडे अपील अर्ज केला होता.

अर्जाच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी २/८/२०२४ रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. परंतु, पुढील सुनावणी दरम्यान सामनेवाला यांचे वकील ॲड. परेश देशमुख यांनी आपली बाजू मांडल्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त विकास पानसरे यांनी २३/८/२०२४ रोजी काशीबाई ठाकूर यांचा अपील अर्ज फेटाळला आहे आणि जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील आदेश क्र. ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र. ०१/२०२३ मध्ये दि १७/७/२०२४ रोजी दिलेला आदेश कायम केला आहे. त्यामुळे सदर प्रकरणात सातत्याने लक्ष घालून असलेल्या उरणमधील माजी आमदार मनोहर भोईर आणि ठाकरे गटाला ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

आता पुन्हा एकदा सरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे (शिवसेना शिंदे गट) ह्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांचेवर सर्व गटातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!