घन:श्याम कडू
उरण : वरदा केदार आसरकर हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वरदा आसरकर हिला आतापर्यंत केलेल्या स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरीची दखल घेऊन हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 (कराड, सातारा) येथे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अमोल साठे व ॲड. सुरेंद्र कॅमेरामन (आशियाई सुवर्ण पदक विजेता) यांच्या टीमतर्फे करण्यात आले होते. दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस हॉकीचे जादूगार मे. ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा शेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रिडापटूंना सन्मानित करण्यात येते. वरदा आसरकर हिला पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.