• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण विधानसभा मतदारसंघासाठी घरगुती गणपती सजावट स्पर्धा

ByEditor

Aug 30, 2024

बळवली माजी उपसरपंच गणेश पाटील यांचे शानदार नियोजन

विनायक पाटील

पेण : पेण विधानसभा मतदारसंघ भाजप युवा मोर्चा रायगड अध्यक्ष तथा बळवली माजी उपसरपंच गणेश पाटील यांनी पेण विधानसभा मतदारसंघ मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी विजेत्यांना प्रथम क्रमांक 5000/- रुपये,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक 4000/- रुपये,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक 3000/- रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह,चतुर्थ क्रमांक 2000/- रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच उत्तेजनार्थ 1000/- प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह प्रमाणे पाच बक्षीस देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी काही नियम व अटी खालील प्रमाणे

1. आपल्या गणपती सजावटीचे फोटो 9 तारखेपर्यंत स्वीकारले जातील.
2. आपल्या सजावटीचे 3 फोटो व 30 सेकंदाची रिल्स पाठवावी.
3. फोटो स्वतःच्या घरातील गणपती बाप्पाचा असावा.
4. विजेत्यांना प्रमाणपत्रासह विशेष सन्मान चिन्ह देण्यात येईल.
5. आपल्या गणपती सजावटी सोबत स्वतःचा फोटो असणे अनिवार्य आहे.
6. ही स्पर्धा पेन विधानसभा मतदारसंघ मर्यादित आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पारस दरेकर 8411828818 , रोहन दुगडे 9028510389, रोशन चाफेकर 8888056093, महेश ठाकूर 9960880333 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पेण विधानसभा मतदार संघ भाजप युवा मोर्चा रायगड अध्यक्ष तथा बळवली माजी उपसरपंच गणेश पाटील यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!