• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी मिलिंद अष्टीवकर यांची निवड

ByEditor

Aug 31, 2024

मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पुणे येथे केली घोषणा

शशिकांत मोरे
धाटाव :
मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणुन परिचित असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मिलिंद सिताराम अष्टिवकर यांची निवड झाली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी पुणे येथे ही घोषणा केली. १८ वर्षांनंतर जिल्ह्याला दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाल्याने या निवडीने रायगड जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष, माजी कोकण विभागीय सचिव आणि विद्यमान कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहीले आहे. ८४ वर्षांची परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस यांची निवडणुक निर्णय अधिकारी निवडणुक कार्यक्रम जाहीर करून या पदांची निवडणुक होते. दोन वर्षांनी कार्याध्यक्ष यांची अध्यक्षपदी निवड होत असते. मिलिंद अष्टिवकर यांच्या माध्यमातून १८ वर्षांनी हा बहुमान दुसऱ्यांदा रायगड जिल्ह्याला मिळाला आहे. यापूर्वी दैनिक कृषीवलच्या संपादिका सुप्रियाताई पाटील यांनी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष असलेले मिलिंद अष्टिवकर हे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर आहेत. तसेच ते कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष म्हणून देखील ते कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात कोकणातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. दैनिक लोकमत, दैनिक नवशक्ती अशा विविध दैनिकांमध्ये ते प्रतिनिधी म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी पुण्यनगरी, गावकरी, शिवतेज, कृषिवल, सागर, रत्नागिरी टाईम्स, रायगड टाईम्स आदी दैनिकांत काम केले आहे. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत विविध राज्यांचा अभ्यास दौऱ्यात त्यांनी सहभाग घेतला. रायगड जिल्हा प्रेस क्लबचा त्यांचा अध्यक्षीय कार्यकाळ मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण मागणीसाठीच्या विविध आंदोलनांमुळे संस्मरणिय ठरला आहे.

त्यांच्या या नियुक्तीचे स्वागत सर्वस्तरातुन होत असून परिषदेचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे, माजी अध्यक्ष भारत रांजणकर, परिषदेचे कोकण विभगिय सचिव अनिल भोळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले आदींनी त्यांचेकडे संपर्क साधुन त्यांचे अभिनंदन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!