• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उरणमध्ये!

ByEditor

Aug 31, 2024

उपजिल्हा रूग्णालयाचे भूमीपूजन आणि इतर विकासकामांचा लोकार्पण सोहळा

अनंत नारंगीकर
उरण :
भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील पंधरा वर्षांपासून रखडलेल्या उरण येथील उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा व उरण शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवन, सावित्रीबाई फुले फुलबाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर तसेच सिडकोने चारफाटा येथे बांधलेल्या मासळी बाजाराचा लोकार्पण सोहळा डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उरण नगरपरिषद मराठी शाळा पेन्शन पार्क उरण येथील प्रांगणात रविवारी (दि. १) दुपारी ठिक ३ वाजता पार पडणार आहे.

उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून शासनस्तरावरील कोट्यवधी रुपयांच्या निधीतून ही विकासकामे करण्यात आली आहेत. या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन उरण नगरपरिषदेच्या नानासाहेब धर्माधिकारी विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, खा. श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार ज्ञानेश्वर पाटील तसेच अनेक आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!