• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात गळफास घेऊन २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

ByEditor

Aug 31, 2024

सलीम शेख
माणगाव :
कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास माणगावात घडली. याबाबतची खबर सुरज राजू मोहिते (वय-२७, रा. दत्तनगर माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत अक्षय राजू मोहिते (वय -२३, रा. अमित कॉम्प्लेक्स माणगाव) याने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव टेंबे वाडा समोरील माणगाव-पुणे रस्त्यालगत असलेल्या वक्रतुंड इंटरप्रायजेस या गाळ्यामधील लोखंडी पाईपला नॉयलानच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्यास उपचाराकरिता माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निमकर हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!