• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी शिबिरासाठी कौस्तुभ म्हात्रेची निवड

ByEditor

Aug 31, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित २३ वर्षाखालील मुलांची आगामी २०२४-२५ क्रिकेट हंगामासाठी निवड चाचणी प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोिएशनच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या २१ जिल्ह्यातील व विविध क्लबमधील युवा गुणवान खेळाडूंचा शोध सध्या एमसीए घेत आहे. यावर्षी एमसीएतर्फे ‘महास्पीड – शोध महा वेगाचा’ हा उपक्रम घेण्यात आला होता. ह्यातूनच रायगड जिल्हातील पेण तालुक्यातील निगडे गावाचा युवा वेगवान गोलंदाज कौस्तुभ म्हात्रेची निवड एमसीएच्या निवड चाचणी शिबिरासाठी करण्यात आली आहे.

कौस्तुभ म्हात्रे हा युवा गुणवंत गोलंदाज असून त्यांनी एमसीएच्या महास्पिड इव्हेंटमध्ये ताशी १३० च्या वेगाने गोलंदाजी केली होती. ह्यातूनच कौस्तुभ म्हात्रेंची निवड करण्यात आली आहे. तसेच गेल्या आठवड्यात एमसीएच्या १९ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील उरणच्या अमेय पाटील व महाडच्या साहिल भिल्लारे यांची निवड करण्यात आली. १६ वर्षाखालील मुलांमध्ये पनवेलच्या क्रिश बहिरा व मिलन चौरसिया आणि माणगावच्या आर्यन पानावकर यांची एमसीएच्या शिबरासाठी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू व जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!