अनंत नारंगीकर
उरण : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी सध्या संपावर आहेत. ज्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र उरण एसटी आगारातील जवळ जवळ सर्व बस सुरू असून फक्त लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्याची माहीती उरण बस आगारातील अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोडीस तोड वेतन, कॅशलेस वैद्यकीय सेवा, कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांसाठी मोफत पास या सवलतींसह विविध मागण्यांसाठी मंगळवार पासून संप पुकारला आहे. मात्र या संपाचा उरणच्या एसटी बस सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. उरण आगारातील 44 बसेस पैकी फक्त लाब पल्ल्याच्या चार बसेस बंद असून लोकल सर्व बसेस चालू आहेत. या आगारातून तालुक्याच्या ग्रामीण भागासह मुंबईतील दादर, ठाणे, शिर्डी, अक्कलकोट, कराड व मालेगाव अशा लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूकही सातत्याने सुरू आहे. या आगारात एकूण ४४ एस टी बस असून त्या दररोज २७४ फेऱ्या मारून प्रवासी वाहतूक करीत असतात. त्यासाठी ९२ चालक व ७२ वाहक आहेत.
