• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एमसीए आयोजित पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेत रायगड जिल्ह्यातील आठ पंच उत्तीर्ण

ByEditor

Sep 5, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्यावतीने आयोजीत केलेल्या क्रिकेट पंचांच्या मुख्य लेखी परीक्षेचा निकाल काल एमसीएकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या अधिकार क्षेत्रातील २१ जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील आठ पंच उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तीर्ण झालेले पंच पुढीप्रमाणे
वरुण म्हात्रे (उरण), विघ्नहर्ता मुंढे (पनवेल), सागर मुळे (पेण), रोहन पाटील (उरण), अभिजित वाडकर (अलिबाग), चंद्रकांत चौधरी (कर्जत), निशांत माळी (रसायनी), प्रशांत माळी (उरण) यांचा समावेश आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांची प्रॅक्टिकल परीक्षा आहे. महाराष्ट्रातील सर्व पांचाना एमसीएच्यावतीने ऑनलाईन व कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील पंचांसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने माजी रणजी खेळाडू व विद्यमान बीसीसीआय पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट अअसोसिएशनचे पंच राजन कसबे व रायगड जिल्ह्यातील क्रिकेट तज्ञ नयन कट्टा यांनी गेले दोन महिने अथक परिश्रम घेऊन ऑनलाइन व कार्यशाळाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे व ह्यापुढेही करत रहाणार आहेत.

पंच शिबिरासाठी विनामूल्य हॉल आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे खोपोली व डी. के. भोईर उरण यांनी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच सर्व पंचाना मार्गदर्शन मिळावे ह्यासाठी ॲड. पंकज पंडित, प्रदीप खलाटे, शंकर दळवी, सुयोग चौधरी यांनी परिश्रम घेतले. सर्व उत्तीर्ण झालेल्या पंचांचे आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू व क्रिकेट प्रेमींनी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!