बाजारपेठ सजली, चित्र शाळेत मुर्ती कारागिर दंग
अनंत नारंगीकर
उरण : गणेशोत्सवाला एक ते दोन दिवसांचा अवधी उरला असतानाच उरण तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात हर तऱ्हेच्या गणेशमूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात मुर्ती कारागिर दंग झाल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या फुलं, हार, झाडावेलींबरोबर रंगीबेरंगी विद्युत साहित्याची तसेच अगरबत्तीसह पुजेसाठी लागणाऱ्या सामान, साहित्यानी बाजारपेठ सजल्या आहेत. तसेच ढोलकी विक्रेत्यांची गावागावात रेलचेल सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उरण तालुक्यात दोनशे लहान मोठे कारखाने आहेत. त्यातील एकट्या चिरनेर गावात ३५ कारखाने आहेत. दरवर्षी मे ते जून महिन्यात सर्व कारखान्यात गणेशमूर्ती घडविण्याच्या कामाला सुरुवात होत असते. यावर्षीही वाढत्या वीज समस्येचा सामना हा मुर्ती कारागिरांना सहन करावा लागला आहे. यावर्षी शनिवारी ७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने उरण तालुक्यातील अनेक कलाकारांच्या गणपती कारखान्यात हरतऱ्हेच्या गणेशमूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात मुर्ती कारागिर दंग झाले आहेत. विविध प्रकारच्या प्लास्टिकच्या फ़ुलं, हार, झाडाबरोबर विद्युत साहित्याची तसेच अगरबत्तीसह पुजेसाठी लागणाऱ्या सामान, साहित्यासाठी उरण शहर, गावोगावच्या बाजारपेठ सजल्या आहेत. ढोलकी विक्रेत्यांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मात्र वाढत्या शाडू मातीच्या व रंगांच्या किंमतीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किमतीत वाढ होणार असल्याचे मत चिरनेर चित्र शाळेतील मुर्तीकार जागृती राम चौलकर यांनी सांगितले.
