• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; बदलापूरमधील धक्कादायक घटना

ByEditor

Sep 9, 2024

ठाणे : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीणीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसांपूर्वी या तरुणीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर तरुणीने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितेवर तरुणीच्या घरी एका मित्राने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी तरुणीशी संपर्क केला असता तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितलं. त्यामुळे पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं.

याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र हा बलात्कार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण साताऱ्याहून आलेला शिवम राजे (22) आणि संतोष रुपवते (40) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करीत या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!