अनंत नारंगीकर
उरण : दिघोडे-वेश्वी रस्त्यावर मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघात हा मंगळवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास घडला. या अपघातात फोरव्हीलर गाडीतून गणपती बाप्पाच्या दर्शनावरुन येणारे भाविक थोडक्यात बचावले आहेत. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
कंटेनर यार्ड व्यवसायिक, पोलीस, वाहतूक विभाग तसेच संबंधित प्रशासनाने उरण तालुक्यातील खोपटा-कोप्रोली, दास्तान फाटा-दिघोडे आणि गव्हाण फाटा-चिरनेर या रस्त्यावरील अवजड वाहनांची रेलचेल ही गणेशोत्सवात सकाळी ६ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत बंद केलेली नाही. त्यामुळे गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात दिघोडे-वेश्वी रस्त्यावर मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना मंगळवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात फोरव्हीलर गाडीतून गणपती बाप्पाच्या दर्शनावरून येणारे भाविक थोडक्यात बचावले आहेत. मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मधोमध पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी वर्गानी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
