रायगड : जिल्ह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रसायन कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा भीषण होता की एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. साधना नायट्रोकेम कंपनीत हा स्फोट झाला. स्फोटाने कंपनीच्या परिसरात घबराट निर्माण झाली असून अग्नीशमन दल, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)
