माणगाव तालुकाध्यक्ष पदी काका नवगणे, प्रवक्त्या सायली दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुभाष केकाणे
सलीम शेख
माणगाव : आगामी विधानसभा निवडणुका कांही दिवसावर आल्या असताना राष्ट्रवादी कॉ. अजित पवार गट पक्षाने रायगड जिल्ह्यात विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सुतारवाडी येथे गीता बाग येथील राष्ट्रवादी कॉ. पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रवादी कॉ. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित व आदेशानुसार ता. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा कार्यकारणी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध विषयावर खा. सुनील तटकरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी खा. तटकरे यांच्या सुचने नुसार माणगाव तालुकाध्यक्ष पदी काका नवगणे तळाशेत यांची नियुक्ती राष्ट्रवादी कॉ. पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी केली. तसेच राष्ट्रवादी कॉ. पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुभाष केकाणे यांची तर कोकण प्रभाग राज्यप्रमुख प्रवक्त्या सायली दळवी जाधव यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केली असून तसे पत्र देण्यात आले.
शुक्रवारी (ता. १३ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता जिल्हा कार्यकारणीची बैठक सुतारवाडी गीताबाग येथे राष्ट्रवादी काँ. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य आणि विस्तारीत जिल्हा कार्यकारणी सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी पंचायत समिती सदस्य, सभापती प्रांतिक सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्षा व सर्व महिला आघाडी प्रमुख युवक युवती अध्यक्ष आणि पदाधिकारी शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी. विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष, विभागीय अध्यक्ष तसेच जिल्हा स्तरावरील आणि तालुका स्तरावरील प्रमुख नेतेमंडळी आणि कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी खा. सुनील तटकरे, मंत्री, महिला व बालकल्याण महाराष्ट्र राज्य ना. आदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँ. पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील तसेच महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर, माणगाव तालुका माजी अध्यक्ष सुभाष केकाणे, ज्येष्ठ नेते शेखरशेठ देशमुख, संताजी पवार, राजू शिर्के, सायली दळवी, शादाब गैबी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
