• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुरुड पोलिस ठाण्याला नागरिकांचा घेराव!

ByEditor

Sep 13, 2024

मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत मुस्लिम मुलांनी केली दगडफेक

अमुलकुमार जैन
रायगड :
पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होत असताना अनुचित प्रकार घडल्याने मुरुड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आज संपूर्ण मुरुड शहर बंद ठेवण्यात आले होते.

गौरी गणपती विसर्जन मिरवणूक भोगेश्वर पाखाडीतुन 60 घरातील गणपती निघत असताना अचानक या विसर्जन मिरवणूकीवर सायंकाळी ६च्या दरम्यान ८ ते 9 वर्षाच्या आतील दोन मुस्लिम मुलांनी दगडफेक केली. त्यामुळे या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आज सकाळी ११च्या दरम्यान शहरातील हिंदु समाजाने मुरुड पोलिस ठाण्याला घेराव घालून दोन्ही मुलांना व पालकांना अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणी समस्त हिंदू समाजाने मुरुड तालुक्यातून एकत्र येत अटक करण्याची मागणी लावून धरली. सकाळी मुरुड पोलीस स्टेशन परिसरात गर्दी हळूहळू वाढत जाऊन शेकडोच्या संख्येने लोक पोलीस ठाण्यात जमा झाले होते.

गुरुवार, दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान भोगेश्वर पाखाडीत गणपती मिरवणुकीवर दगडफेक केल्याने यामध्ये सहा महिलांना दगड लागुन त्या किरकोळ जखमी झाल्या. ही बातमी मिळताच तात्काळ मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी येऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु पोलिसांकडून अजूनपर्यंत दोन्ही मुलांवर व पालकांवर कारवाई होत नसल्याने सकाळच्या दरम्यान शेकडो हिंदू नागरिकांनी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना घेराव घालून दोन्ही मुलांना व पालकांना अटक करा अशी मागणी केली. परंतु तीन तास होऊन गेले तरी कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांकडुन तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत या ठिकाणी ठिय्या आंदोलन करु असे आवाहन यावेळी नागरिकांकडून करण्यात आले. झालेल्या घटनेचा फलक घेऊन निषेध करण्यात आला.

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, भारत माता की जय, जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी अलिबाग विभागीय पोलिस अधिकारी विनित चौधरी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मुलांना अटक करा अशा घोषणा नागरिकांकडुन देण्यात आल्या. अखेर डीवायएसपी विनीत चौधरी यांनी उपस्थित नागरिकांना तक्रार नोंद घेत असून लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यांनतर मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार नोंद प्रक्रिया सुरू केली. दरम्यानच्या काळात वाद वाढू नये व मुरुड शहराची शांतता अबाधित रहावी यासाठी मुरुड पोलिसांनी शहरातील नागरिकांना आवहन केले की, कोणीही घरातून बाहेर पडू नये. सर्व नागरिकांनी घरातच रहावे. पोलिसांच्या या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन बाजारपेठमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!