डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे यांच्या घरी भागवत सप्ताह पारायण
विनायक पाटील
पेण : भागवत धर्मातील शिकवणीप्रमाणे प्रत्येकाने आपली कर्म करीत राहिले पाहिजे. ज्याला ज्या कार्याची आवड आहे त्याप्रमाणे मन लावून काम करावे असे वक्तव्य खासदार धैर्यशील पाटील यांनी डोलवी येथील भागवत सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात केले.
डोलवी१ येथील सरपंच परशूराम म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीमद् भागवत सप्ताह पारायणाची सांगता झाली. यावेळी पेणचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा जाहीर सत्कार सरपंच परशूराम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, मधूशेठ म्हात्रे आदींच्या हस्ते शाल श्रीफळ व भारतीय राजमुद्रा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील,उद्योजक राजू पीचीका, जेएसडब्लु कंपनीचे उपाध्यक्ष राजेश रॉय, जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी प्रवचनकार पुरुषोत्तम महाराज धाटावकर यांचेसह धार्मिक क्षेत्रातील शेकडो मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्राध्यापक जांभळे यांनी केले.
