विनायक पाटील
पेण : संपूर्ण देशात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजाची 2013 रोजी स्थापना करण्यात आली. कोणत्याही संकटात जनतेच्या सुरक्षेची काळजी घेताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या दादर सागरी पोलिस व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते यावेळी बाप्पाची महाआरती संपन्न झाली. यावेळी जोहेचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .

याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शेकाप खजिनदार आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, युवा नेते प्रसाद भोईर, शिवसेना नेते विष्णुभाई पाटील, दादर सागरी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नागेश कदम, तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर, माजी सभापती सुरेश पाटील, प्रसिद्ध उद्योजक राजुशेठ पिचिका, विशाल बाफणा, अमित खारकर, नगरसेवक निवृत्ती पाटील, समाजसेवक दत्ता कांबळे, राकेश मोकल, शैलेश पाटील, विवेक जोशी, विनोद पाटील, गोपीनाथ मोकल, रमेश पाटील, योगेश चौधरी, साज मराठी निर्माते सुनिल पाटील, जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष नारायण म्हात्रे, वैभव धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र रसाळ, कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे, कमलाकर बोरकर, हेमंत पेरवी आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्षभर गणेश मूर्ती बनविण्यात पेण तालुक्यासह जोहे गावातील जेष्ठ, महिला व युवा वर्ग व्यस्त असतो. मात्र श्रीगणेश चतुर्थी गणेशोत्सव झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीला विशेषतः पेण, पनवेल, उरण आदी तालुक्यात घरगुती व सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखरचौथ गणपती सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 2013 साली स्थापन झालेल्या व शाळेला वॉटर कुलर, वॉटर फिल्टर, महिलांसाठी होम मिनिस्टर, हळदीकुंकू, शाळेय विद्यार्थी दत्तक घेणे, जेष्ठ व महिलांसाठी वेगवेगळे शिबीर, रक्तदान शिबिर आयोजित करणे आदी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जोहेचा राजा प्रतिष्ठान तर्फे जोहे गावात दरवर्षी प्रमाणे पाच दिवसांसाठी साखरचौथ गणपती बाप्पा विराजमान झाला आहे.
कोणताही सण असल्यावर जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या व धार्मिक कार्यात आपल्या कुटुंबापासून नेहमी दूर असणाऱ्या दादर सागरी पोलीस स्टेशनला व सामाजिक आणि राजकिय नेत्यांना जोहेचा राजाच्या महाआरतीचा मान देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी, राजकीय व सामाजिक नेते व शेकडो भक्तांच्या उपस्थितीत बाप्पाची महाआरती करण्यात आली. दरम्यान प्रसिद्ध गायक विशाल रसाळ, खालापूर यांच्या भावगीते, भक्तिगीते व संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.