सलीम शेख
माणगाव : माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्ष पदाचा ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा नुकताच अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधीकारी किशन जावळे यांनी जाहीर केला असून दि. ४ ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे.
माणगाव हे रायगड जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदूं म्हणून ओळखले जाते. त्यामुळे संपूर्ण रायगडवासियांचे लक्ष माणगावचा पुढील नगराध्यक्ष कोण होणार? याकडे लागून राहिले आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र माणगाव नगरपंचायत कार्यालय सभागृहात अधिकाऱ्यांकडे दाखल करायचे आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत, निवडणुकीचे पिठासन अधिकारी यांच्या कडून नामनिर्देशन अर्जाची छाननी दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ नंतर,नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात आलेली आहेत त्या उमेदवारांची नावे आणि नामनिर्देशन पत्रे फेटाळण्याची करणे सूचना फलकावर प्रसिद्ध करणे दि.२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत,पिठासन अधिकाऱ्याचे निर्णयाविरुद्ध अपील दाखल करण्याचा कालावधी शुक्रवार दि.२७ सप्टेंबर सायंकाळी ५ पासून ते मंगळवार दि. १ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत वैध नामनिर्देशन पत्राची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करणे दि.१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ,उमेदवारी मागे घेणे दि.३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत,उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे (वर्णानुक्रमे)दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ नंतर, अध्यक्ष पदासाठी निवडणूक विशेष सभा दिनांक व वेळ दि.४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता,निवडणूक लढविणाऱ्या व उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे विशेष सभेत वाचून दाखविणे १२ वाजून ५ मिनिटानंतर, अध्यक्षपदाची निवडणूक घेणे व निकाल घोषित करणे. दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटानंतर असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.