• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाड आंबेवाडी बाजारपेठेतील बनारस जनरल स्टोअर्स दुकानात चोरी

ByEditor

Sep 25, 2024

लाखो रुपये किंमतीच्या सिगारेट व रोख रक्कम लंपास

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड आंबेवाडी नाका बाजारपेठेतील तटकरे पार्क येथील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलंचद जैस्वाल यांच्या दुकानातुन अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत किमतीचा सिगारेटचा माल तसेच १५०० ते १६०० रुपयांची चिल्लर दुकानाचे शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी लंपास केली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, मंगळवार, दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री आंबेवाडी बाजारपेठेतील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलचंद जैस्वाल यांच्या शटरचे लॉक तोडून दुकानातुन विविध प्रकारच्या सिगारेटचा अंदाजे एक लाख ७५ हजार ते २ लाखापर्यंतचा माल तसेच १५०० ते १६०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी लंपास केली आहे. विशेष म्हणजेच मागील दोन महिन्यांपासून कोलाड ते वाकण दरम्यान ७ ते ८ दुकानात चोरी झाली असुन या सर्वच दुकानातुन फक्त सिगारेटचा माल व रोख रक्कम चोरीला जात असल्याचे समोर आले आहे.

कोलाड आंबेवाडी नाक्यावरील घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून याबाबत कोलाड पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू कोलाड पोलीस करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!