अब्दुल सोगावकर
सोगाव-अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील श्री गणेश मित्रमंडळ मूनवली यांच्यातर्फे दिड दिवसीय साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आरती, पूजा, भजन, नाच तसेच इतर अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह लहान मुलांचे व महिलांचे फनी गेम्स मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनील थळे, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, सातीर्जे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्राची ठाकूर यांच्यासह ग्रुप ग्रामपंचायत मापगांव माजी उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, माजी सदस्य चंद्रकांत खोत, अण्णा सातमकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, विवेक जोशी, बहिरोळे पो.पा. प्रफुल्ल थळे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, सतिश घाडी, अनिल जाधव, राजेंद्र घरत, सचिन घाडी, युवा नेता सूचित थळे, मुनावर कुर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे आदी मान्यवर श्रींच्या दर्शनासाठी व मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. तसेच दिड दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आले. महिलांसाठी घेतलेल्या ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात ‘भाग्यवान स्त्री’ विजेती म्हणून नेहा कांबळे/घोडपकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष बांद्रे, उपाध्यक्ष अमोल मोंढे, खजिनदार वामन ठकरूळ, सचिव संजय अनमाने व इतर सर्व सदस्य तसेच महिला मंडळ मूनवली व मूनवली ग्रामस्थ यांनी साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. दुसऱ्या दिवशी रात्री महाप्रसादानंतर भव्य मिरवणुकीत वाजतगाजत श्रींचे विसर्जन करण्यात आले.