• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, २ जखमी

ByEditor

Sep 26, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगावपासून जवळच्या अंतरावर असलेल्या ढालघर गावच्या हद्दीत ढालघर फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू होऊन २ जण जखमी झाले. सदरील अपघात बुधवार, दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ :४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद दुचाकी चालक नथुराम शिवराम जाधव (वय-४७, रा. चेरवली ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या अपघातातील फिर्यादी नथुराम शिवराम जाधव हे त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एमएच ०६ बीएल ६०९७ या गाडीवर त्यांची आई मयत शांताबाई शिवराम जाधव (वय-६५, रा. चेरवली ता. माणगाव) यांना सोबत घेऊन सदरची मोटारसायकल मुंबई-गोवा महामार्गाने स्वतः चालवीत माणगाव बाजूकडून लोणेरे बाजूकडे घेऊन जात असताना त्यांची गाडी ढालघर फाटा येथे आल्यावेळी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणारा ट्रेलर क्र. डीएन ०९ आर ९७९१ या गाडीवरील चालक आरोपी अभय रामछेबर सिंग (वय-४२, रा. अमिसराय, उत्तरप्रदेश) याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर अति वेगाने चालवून मोटारसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांची आई शांताबाई शिवराम जाधव यांना गंभीर दुखापती होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक नथुराम शिवराम जाधव व धोंडीबाई लक्ष्मण जाधव (वय-५५, रा. खरवली ता. माणगाव) हे २ जण जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.२१७/२०२४ भा.द.वि.संहिता कलम १०६ (१ ),१२५ अ,१२५ ब,२८१ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे करण्यात येऊन आरोपी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परी. महिला पोलीस उपनिरीक्षक ढोणे या करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!