सलीम शेख
माणगाव : माणगाव काळ नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वी घडली. याबाबतची खबर दिपाली नयन खेडेकर (वय-३६) पोलीस पाटील निजामपूर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून माहिती अशी कि, घटनेतील अज्ञात इसम याचे प्रेत हे काळ नदीच्या पात्रात वाहत आल्याने तो पाण्यात बुडून मयत झाला. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.५४/२०२४ भा.ना.सु.सं.चे कलम १९४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.