• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेणमध्ये खळबळ! जेवण बनवलं नाही म्हणून पती गोपीनाथ वाघमारेने केली पत्नी पिंकीची निर्घृण हत्या

ByEditor

Sep 28, 2024

विनायक पाटील
पेण :
तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनविण्याच्या भांडणातून व गावठी दारूच्या नशेत पत्नीची क्रूरपणे हत्या केली तसेच पतीने पत्नीचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि. 24) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पेण पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि. 24) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील शहापाडा धरणाचे परिसरात एका कुटुंबातील पती गोपीनाथ वाघमारे (40) आणि पत्नी पिंकी वाघमारे (45) यांच्यामध्ये जेवण बनविण्यावरून वाद झाला. दारुच्या नशेत आरोपी पती याने जेवण न बनविण्याचे कारणावरून पत्नीबरोबर भांडण करून हाताबुक्क्यांनी पत्नीला मारहाण केली. शिवाय भिंतीवर आपटून जीवेठार मारले. याप्रकरणी गुन्ह्यातील आरोपीस 25 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!