घन:श्याम कडू
उरण : मातोश्रीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज उरणमधील प्रमुख्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे मनोहरशेठ भोईर यांच्या नावाला ग्रीन सिग्नल देत भगवा फडकविण्यासाठी काम जोरात सुरू करण्याचे सूतोवाच केले.
आगामी उरण विधानसभा निवडणूक संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उरण विधानसभा मतदारसंघाकरीता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोहरशेठ भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना सचिव विनायक राऊत, आ. मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, संपर्कप्रमुख महादेव घरत, उप जिल्हाप्रमुख नरेश राहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर आणि शहरप्रमुख विनोद म्हात्रे उपस्थित होते. यानंतर जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी उरण विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचा भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.