प्रतिनिधी
नागोठणे : कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दत्तक गाव वेलशेत आंबेघर येथे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सहभागी विद्यार्थ्यांनी आंबेघर व वेलशेत येथिल मैदान व मुख्य रस्त्यावरील प्लास्टिक व सुका कचरा गोळा केला व ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असलेल्या घंटागाडीत एकत्रित केला.


या अभियानात ग्रामविकास अधिकारी विजय आहिरे, कांचन माळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. हे अभियान कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकृष्ण तुपारे व डॉ. मनोहर शिरसाठ यांनी राबवले. महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून सुरू केलेल्या या अभियानात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ५२ स्वयंसेवक सहभागी झाले होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी साहील घरत, प्रज्वल भोकटे, दक्ष पारंगे, आयूष तडकर, मिरज बावकर, अभिमन्यू, सुमीत घासे, नेहा कोकाटे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.