खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
विनायक पाटील
पेण : रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशन (रजि.) यांच्यातर्फे रविवार, दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्वच छायाचित्रकारांसाठी ‘रायगड फोटो एक्सपो २०२४’ कार्यक्रमाचे आयोजन मराठा समाज हॉल पेण, रायगड येथे केले आहे.या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्वच फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांना उपस्थित राहण्याची रायगड जिल्हा तसेच पेण तालुका असोसिएशकडून निमंत्रण देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रम मराठा समाज हॉल पेण, रायगड येथे दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन व स्वागत होणार असून त्यानंतर प्रवीण बनसोडे सर यांचे ए-आय या विषयावर डेमो देण्यात येणार असून फुजीफिल्म कंपनी कडून सिनेमॅटोग्राफी या विषयावर माहिती देण्यात येणार आहे, नंतर निकॉन कंपनीकडून कॅमेरा व त्या संबंधित उपकरणांबद्दल माहिती व ती कशी हाताळावी या बद्दल प्रत्यक्ष उपकरणे हाताळणी करण्यास देण्यात येणार आहेत. दुपारी सेलिब्रेटी आणि परीक्षक यांचे स्वागतानंतर फॅशन शो आणि इतर अनेक स्पर्धांचे घेण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकाला बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी समीर भायदे अध्यक्ष रायगड फोटोग्राफर असोसिएशन, समीर मालोदे उपाध्यक्ष, आनंद निंबरे सेक्रेटरी, समाधान पाटील अध्यक्ष पेण तालुका व जिल्हा कमिटी हे रायगडमधील प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुका कमिटी, सभासद, फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांना प्रत्यक्ष भेटून कार्यक्रमाचे निमंत्रण देत आहेत व मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.