• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मापगांव येथे नवरात्रोत्सवात होम मिनिस्टर विजेत्या महिलांना गितेश करळकर यांनी दिली १३,००० रुपये किमतीची सोन्याची नथ

ByEditor

Oct 14, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे श्री शारदोत्सव उत्कर्ष क्रीडा मंडळ मापगाव तर्फे नवरात्रोत्सवात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

या नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या काळात भजन, नाच, फॅन्सी ड्रेस, फनी गेम, होम मिनिस्टर आदी लहान मुले, मुली, महिला व पुरुष यांचे अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. यावेळी शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी होम मिनिस्टर हा महिलांसाठीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या खेळामध्ये एकूण १२० महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी अटीतटीच्या खेळामध्ये प्रथम क्रमांक प्रांजली प्रणय मापगांवकर यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक प्राजक्ता प्रमोद मापगांवकर यांनी पटकावले तसेच तृतीय क्रमांक इशिता श्रीधर नागावकर यांनी पटकावले. यातील प्रथम क्रमांक विजेत्यांना सामाजिक कार्यकर्ते गितेश करळकर व धनश्री करळकर- मुशेत या दाम्पत्यांतर्फे १३,०००/ रुपये किमतीची सोन्याची आकर्षक नथ देण्यात आली. तर द्वितीय क्रमांक विजेत्यांना मंडळातर्फे पैठणी देण्यात आली व तृतीय क्रमांक विजेत्यांना मंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

या कार्यक्रमाला मापगाव पंचक्रोशीतील सर्व गटातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांना सामाजिक कार्यकर्ते गितेश करळकर यांनी संबोधित करताना सांगितले की, पुढील वर्षी होम मिनिस्टर हा कार्यक्रम अजून मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!