गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील सन्मित्र सेवासंस्थेच्या वतीने तालुक्यातील कुडगाव व हारवित शाळेतील आदिवासी आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावर्षी ४० विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले आहे. या कार्यक्रमाला सूर्यकांत खनलोसकर, डॉ. निलेश चव्हाण, नारायण खोपटकर मुख्याध्यापक बिरवाडकर, श्रेयस जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या समाजोपयोगी उपक्रमास रजनी मॅडम, सुजित खनलोसकर, मनिष भेडा, अंकुर माने, विराज तोडणकर, विलास तोडणकर व प्रशांत मोरे यांनी बहुमोल सहकार्य केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश वेळासकर शैलेश चांदोरकर, मनिष अमृसकर समिर सुर्वे आणि नितीन सुर्वे यांनी परिश्रम घेतले. संस्थेच्या वतीने दरवर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अत्यावश्यक असलेले शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.