घन:श्याम कडू
उरण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून दोन दिवस उलटत नाही तोच उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे व उरण विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी आमदार मनोहरशेठ भोईर व इतर सहकाऱ्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
उरणमध्ये 2008 साली सेझविरोधात आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात मनोहर भोईर व इतर सहभागी झाले होते. त्यानंतर आज 16 वर्षांनी या प्रकरणात माजी आमदार मनोहरशेठ भोईर व इतर ६ असे एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. काल या केसची सुनावणी होती. ती सुनावणी झाली नाही. सुनावणी आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याचे समजते. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा रडीचा डाव खेळला असल्याचे बोलले जात आहे.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार मनोहरशेठ भोईर यांच्यासह इतरांवर अटकेची कारवाई करण्यात आल्याने सेझग्रस्त बांधवात नाराजीचा सूर निघत आहे.