• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

ByEditor

Oct 17, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगाव-पुणे रस्त्यावर खर्डी गावच्या हद्दीत साबळे क्रेशरजवळ माणगाव या ठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदरील घटना गुरुवार, दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद सहदेव रामचंद्र सोंडकर (वय – ६३) रा.भादाव, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, अपघाताच्या गुन्ह्याची फिर्याद देणारे सहदेव रामचंद्र सोंडकर यांचे भाऊ मधुकर रामचंद्र सोंडकर (वय -५६ रा. नवेनगर निजामपूर, ता. माणगाव) हे आपल्या ताब्यातील होंडा ॲक्टिवा स्कूटी क्र. एमएच ०६ सीएफ ४०३८ ही गाडी निजामपूर ते माणगाव अशी चालवीत घेऊन जात असताना त्यांची गाडी माणगाव जवळील खर्डी गावच्या हद्दीत साबळे क्रेशर जवळील वळणाच्या रस्त्यावर आल्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे अती वेगाने चालवून मयत यांच्या स्कुटीला धडक लागून अपघात घडला. या अपघातात मयत मधुकर सोंडकर यांच्या मानेच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अज्ञात वाहनावरील चालक पळून गेला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं.२३१/२०२४ भा.न्या. सं.कलम १०६(१),१२५ अ,१२५ ब,२८१,मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४ प्रमाणे करण्यात येऊन अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!