क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील मुलींचे सराव शिबिर व संघ निवड चाचणी दि. १९ व २० ऑक्टोबर २०२४ (शनिवार व रविवार) रोजी खारघर येथील इनामपुरीच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. ०१/०९/२००६ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी (एकोणीस वर्षाखालील) हे शिबीर असणार आहे.
सदर शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व मुलींनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात व आवश्यक क्रिकेट साहीत्यासह सकाळी ९:३० वाजता खारघर येथील इनामपुरी मैदानावर हजर राहायचे आहे. सर्व खेळाडुनी सोबत आधार कार्ड (ओरिजीनल आणि फोटोकाॅपी) व स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो आणावा. सदर क्रिकेट शिबिरासाठी सहभागी होण्याकरिता कोणतीही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. ह्या दोन दिवसीय शिबिरातून रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन १९ वर्षाखालील मुलींचा संघ निवडला जाणार आहे, जो ऑक्टोबर महिन्यात एमसीएतर्फे आयोजित केलेल्या आंतरजिल्हा निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होईल. सदर शिबिर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी रोहित काळे 9653126823 यांच्याशी संपर्क साधावा.