• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण तालुक्यातील गडब येथील संस्कार शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव

ByEditor

Oct 17, 2024

गडबमधील शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण -अतुल म्हात्रे

विनायक पाटील
पेण :
तालुक्यातील गडब येथील संस्कार शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव गडब येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामजिक कार्यकर्ते तथा आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, माजी जिल्हापरिषद सदस्य संजय जांभळे, संस्थेचे अध्यक्ष, संजय चवरकर, माजी मुख्याध्यापक के. पी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक चिंतामण मोकल, डोलवीचे उपसरपंच रोहन म्हात्रे, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख हिराजी चोगले, प्रथमेश मोकल, विश्वनाथ पाटील, पी. वाय. पाटील, संदिप म्हात्रे, महेंद्र पाटील, दिनेश म्हात्रे, महेंद्र ठाकुर, अजित कोठेकर, प्रभावती मोकल, गणेश तांडेल, रांजेद्र शेलार आदी मान्यवरांसह संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, नागरिक उपस्थित होते.

संस्कार शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या गडब संस्कार विद्यालयात सत्यनारायणाची महापुजा, महेंद्र पाटील कळवे यांचे भजन, मान्यवरांचा सन्मान, माजी विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान, स्मरणिका प्रकाशन, ढोलकीच्या तालावर विजेती नेहा पाटील यांचे नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य, माजी विद्यार्थ्यांचे नृत्य, आदिवासी मुलींचे नृत्य, शालेय पालकांचे नृत्य, निमंत्रित समुह नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील शाळेप्रमाणे गडबमधील या शाळेत उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते. या संस्थेची अशीच प्रगती होत राहील असे यावेळी सामजिक कार्यकर्ते तथा आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांनी सांगितले.

पेण तालुक्यातील ग्रामिण भागातील गरीब, गरजु मुलांना दर्जेदार शिक्षण देवुन शैक्षणिक पाया मजबुत करणे व संस्कारक्षम नागरिक निर्माण करणे या उदात्त हेतुने संस्कार शिक्षण संस्था गडबची निर्मीती 1999 साली करण्यात आली. एका घरात शिशु वर्गापासुन सुरु झालेली ही शाळा आता संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या प्रशस्त अद्यावत ईमारतीत सुरु आहे. या शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेवुन उच्चस्तरावर नोकरी व व्यवसाय करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!