• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनोहरशेठ भोईर यांना एबी फॉर्म

ByEditor

Oct 18, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण विधानसभा निवडणुकीतील शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार मनोहरशेठ भोईर यांना आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला. त्यामुळे त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे उरण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मनोहरशेठ भोईर यांना पक्षातर्फे एबी फॉर्म देताना सोबत शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, युवासेना जिल्हाध्यक्ष पराग मोहिते, तालुका संपर्कप्रमुख दिपक भोईर, युवासेना उप जिल्हाध्यक्ष नितेश पाटील, ॲड. संतोष खांडेकर उपस्थित होते. आज उरण विधानसभा मतदारसंघातून मनोहरशेठ भोईर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मतदार संघातील शिवसैनिकांत व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!