क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यात रायगडच्या संघांनी पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला आहे.
दक्षिण झोन विरूद्ध झालेल्या सामन्यात रायगडच्या विनय शिर्केनी भेदक गोलंदाजी करत दक्षिण झोन संघाचा अवघ्या ७१ धावसंख्येवर डाव गुंडाळला. विनय शिर्के याने ५ फलंदाज बाद केले. त्याला दुसऱ्या बाजूने उदय जोहल यांनी ३ व आदित्य भारती यांनी २ फलंदाज बाद करत साथ दिली. प्रतिउत्तर देताना रायगडच्या पवन दामगुडे यांनी ३४ तर मधल्या फळीत श्रेय पाटील यांनी ३० धावांचे योगदान संघाला दिले. दुसऱ्या दिवसा अखेर रायगडच्या संघाने २५ षटकांमध्ये सहा गडी गमावत ९१ धावा फलकावर लावल्या. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असल्याने सामना पहिल्या डावाच्या आघाडीवर रायगडने जिंकला.
रायगडचा संघ पुढील प्रमाणे : पृथ्वीराज जवके (कर्णधार), भावेश जाधव, पवन दामगुडे,रुद्र घासे, तनिष्क बिले, हर्षित सिंग, श्रेय पाटील, अंहिक मानकामे, अर्णव साळवी, विनय शिर्के, उदय जोहाल, आदित्य भारती, सुदीप रॉय, आर्यन जोशी.
राखीव खेळाडू – दिव्यांश चौधरी,सौऱ्याश कर, रिषभ ठाकूर, विराट पाटील, इशन पाठक, इम्मौद्दिन शेख.
रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील सचिव प्रदिप नाईक सह सर्व कमिटी सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.