क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सबज्युनियर (१५ वर्षांखालील) मुलींची क्रिकेट निवड चाचणी २१ मे रोजी लोधीवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
रिलायन्स टाऊनशिप मैदान, लोधीवली-खालापूर येथे ही निवड चाचणी होणार आहे. या निवड चाचणीतून रायगड जिल्ह्याचा १५ वर्षांखालील मुलींचा संघ निवडला जाणार आहे. हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १५ वर्षाखालील मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल. १ सप्टेंबर २००८ नंतर जन्मलेले रायगड जिल्ह्यातील खेळाडू या निवड चाचणीसाठी पात्र असतील.
खेळाडूंनी आपल्या स्वतःच्या सहीने साक्षांकित केलेली आधार कार्डची झेरॉक्स प्रत व मूळ आधार कार्ड, स्वतःचे २ रंगीत पासपोर्ट साईज फोटो व जन्म तारखेचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. खेळाडूंनी स्वतःच्या क्रिकेट किटसह व पांढऱ्या पोशाखात निवड चाचणीच्या ठिकाणी २१ मे रोजी सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी प्रशांत ओक (९८२२४२२६७६), प्रीतम कय्या (९३२२२४३५३४), प्रकाश पावसकर (७९७७०१२७४१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी केले आहे.