बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावचे निवृत्त एसटी चालक सदानंद शेलार यांचे शुक्रवारी (२७ डिसेंबर) निधन झाले. त्यांची निधन वार्ता ऐकल्यानंतर परीसरात मित्र परिवारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेलार यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. दोन वर्षापूर्वीच एसटी चालक पदावर चांगल्यारित्या सेवा बजावत त्यांनी निवृत्ती घेतली होती. त्यानंतर सामाजिक कार्याचा भाग म्हणून वाकलघर येथे स्वखर्चातून एसटी शेडची उभारणी केली. एसटी चालक शेलार हे पंचक्रोशीत सर्वांचे परिचयाचे होते. त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी कळताच परीसरात शोककळा पसरली आहे. त्यांची नोकरीतील कारकीर्द व मनमिळाऊ स्वभाव याविषयी अनेकांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.