• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

साळोख ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार विजयी

ByEditor

May 22, 2023

गणेश पवार
कर्जत :
साळोख ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सदस्य दणदणीत मतांनी विजयी झाला असून उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत, रियाजशेठ बुबेरे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार जिंकलाच पाहिजे यासाठी विशेष मेहनत घेतली.

साळोख ग्रामपंचायत सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिंदे गट, राष्ट्रवादी+शेकाप आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे होते त्यात शिवसेनेच्या उमेदवाराने दणदणीत यश संपादन केले. शबनूर सोहेल मधू १४५ मते घेऊन विजयी झाले. त्यावेळी शिवालय येथे उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, रियाजशेठ बुबेरे, प्रभारी तालुकाप्रमुख दिनेश भोईर, उपतालुका संघटक नरेश शेळके, जिल्हापरिषद विभागप्रमुख लक्षण पोसाटे, जिल्हा परिषद संघटक किशोर पोसाटे, पंचायत समिती विभागप्रमुख संतोष राणे, आवेश जुवेरी, आसिम बुबेरे, इमरान आतिफ बुबेरे, इमरान बुबेरे, तकी बुबेरे, ज्येष्ठ शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!