सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील निजामपूर विळे विभागातील पाटणुस ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला भगिनींनी शिवसना शिंदे गटात शनिवारी जाहीर प्रवेश केला. यावेळी येथील गणेश मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते व विभागातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख अँड. महेंद्र मानकर, उपतालुकाप्रमुख नितीन पवार, विभागप्रमुख मनोज सावंत, गणेश समेळ, सुधीर पवार, युवासेनेचे अविनाश नलावडे तसेच आप्पा म्हामुणकर, विजय म्हामुणकर, मंगेश सावंत, सुरेंद्र पालांडे, ज्ञानेश्वर उतेकर, बापी म्हामुनकर, भिकू आंबेकर आदी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर ग्रामपंचायत ही खासदार सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून देखील पाटणुस ग्रामपंचायत हद्दीमधील ग्रामस्थ शिवसेनेत प्रवेश करत आहेत याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून याठिकाणी विकासकामे होत नसल्याचे प्रवेशकर्त्यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलताना सांगितले.