• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सारडे गावाजवळ आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह, परिसरात खळबळ

ByEditor

Oct 21, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
सारडे गावाजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह सोमवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. उरण पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

उरण तालुक्यातील वशेणी-पिरकोण या रस्त्यावर या अगोदर अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आले होते. त्याची माहिती उरण पोलीसांना मिळताच उरण पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सदर महिला व पुरुष जातीच्या व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन आरोपींना जेरबंद केले आहे. त्यात सोमवारी (दि. २१) सारडे गावाजवळ एका अज्ञात पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. या घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने पोलीस तैनात करुन अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे व परिसरातील जागेचे पंचनामे सुरू केले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!