पक्ष संघटना मजबूत करणार -महेश मोहिते
विनायक पाटील
पेण : विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर ॲड. महेश मोहिते यांच्यावर ‘विधानसभा महायुती भाजपा समन्वयक ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मित्र पक्षातील समन्वयकांशी तात्काळ संपर्क करून निवडणूक काळातील समन्वय कामकाजाचे नियोजन ठरवावे व कामकाजाची माहिती प्रत्येक आठवड्याला bjpmaha@gmail.com या मेल आयडीवर पाठवुन मित्र पक्ष विधानसभा समन्वयक शिवसेना विजय पाटील 9370822382, राष्ट्रवादी हर्शल पाटील 8605060111 यांच्याशी संपर्क साधावा. अश्या सूचना ऍड. महेश मोहिते यांना पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.
पक्षश्रेष्ठींनी मोठया विश्वासाने माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे तो विश्वास सार्थ ठरवून विधानसभा अंतर्गत पक्षातील व महायुतीमधील मित्र पक्षांचा योग्य समन्वय व सुसंवाद साधून मतदारांमध्ये जागृती करून पक्ष संघटना मजबूत व वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ॲड. महेश मोहिते यांनी बोलताना सांगितले.