• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सुरेश मगर यांची शामराव पेजे इतर मागासवर्गीय महामंडळाच्या अशासकीय संचालक मंडळावर नियुक्ती

ByEditor

Oct 22, 2024

महेश मोहिते
रोहा :
राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक, ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर यांची खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत शामराव पेजे कोकण व इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अशासकीय संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रोहा तालुका ओबीसी जनमोर्चाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी सुरेश मगर यांचा तालुक्यातील ओबीसी जनमोर्चाच्या सर्व विभागीय अध्यक्षांकडून व अन्य संस्थांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती सुरेश मगर यांनी सर्वांचे आभार मानत मार्गदर्शन करताना ओबीसींच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. यावेळी अन्य ओबीसी नेते मंडळींनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ओबीसी नेते मारुतीराव खरीवले, रामचंद्र सकपाळ, नंदकुमार म्हात्रे, अनंत थिटे, खेळु ढमाळ, धनेश्वर साळुंखे, लक्ष्मण मोरे, शशिकांत कडु, अमित मोहिते, नवनीत डोलकर, उत्तम नाईक, महादेव सरसंबे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!