• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्री मरीआई क्रीडा मंडळ, बांधण तर्फे सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा सत्कार

ByEditor

Oct 22, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील बांधण येथील श्री मरीआई क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ बांधण यांनी रविवार दि.२०ऑक्टोबर २०२४ रोजी श्री. सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती, यावेळी पूजेनिमिमित्ताने तिर्थप्रसाद घेण्यासाठी उपस्थित मुनवली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा श्री मरीआई बांधण मंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.

मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना त्यांच्या करत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे नुकतेच कुलाबा जीवन गौरव पुरस्कार, ‘नवराष्ट्र तर्फे आदर्श सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘आपदा मित्र’ पुरस्कार मिळविला आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा श्री मरीआई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत घाडी, उपाध्यक्ष निलेश भिसे, खजिनदार प्रज्वल फुटक यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करत कौतुकाचा वर्षांव करण्यात आला. यावेळी मंडळाचे विजेंद्र घाडी, स्वप्निल पाटील, अनिकेत भिंगे, जितेंद्र म्हात्रे, दिपक गोविलकर, रुपेश सूद, मंथन राडे, राहुल गोविलकर व इतर सदस्य, ग्रामस्थ मंडळ बांधण तसेच सचिन घाडी यांच्यासोबत त्यांचे कुटुंब आणि सचिन घाडी मित्रमंडळाचे मयूर अनमाने, केदार ठकरूळव तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!