• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सीएफआय व बीएनवाय मेलन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात

ByEditor

Oct 26, 2024

विनायक पाटील
पेण :
सीएफआय व बीएनवाय मेलन संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे २०२३-२४ या सालाकरिता गरजू मुलामुलींना उच्च शिक्षणाकरिता मदत करण्यात आली. चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनांतर्गत २५ हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. शैक्षणिक प्रगती चांगली असून पण कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे किंवा मुख्यत्वेकरून ज्या मुलांच्या डोक्यावर आई-वडिलांचं छप्पर हरविलेल आहे, या व अशा अनेक कारणांमुळे त्याचं शिक्षण थांबू नये व त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये कोणतेही आर्थिक दडपण न ठेवता शिक्षण घेता यावे हा या मदतीमागचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमांतर्गत २५ विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली. त्याला आज रोजी एक वर्ष पूर्ण होत असून सर्व विद्यार्थी व पालक यांनी सीएफआय संस्थेचे प्रमुख डॉ. किशोर देशमुख व बीएनवाय मेलन या संस्थेचे आभार मानले तसेच मदतीमुळेच आमची मुले अगदी आनंदाने त्यांचे शिक्षण घेत असून आमचाही आर्थिक भार कमी झाला आहे असे मनोगत पालकांनी व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!