निष्ठावंतांनी एकत्र येऊन गद्दार पोपटाचा डोळा फोडा, मातोश्रीचे आदेश
अमुलकुमार जैन
रायगड : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे माथेरान शहरातील माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक यांनी सुधाकर घारे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेल्या आमदारानी बंड करत शिवसेनेत शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झालेल्या दोन गटापैकी शिंदे गटात जाऊन गद्दारी केली. तो उमेदवार पुन्हा शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी लढवत असल्याने, ठाकरे गटाचा विजय व या बंडखोराचा पराजय हा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा मुख्य मनसुबा असताना व महायुतीमधील असलेले या मतदार संघातील बंड पाहाता सध्या कर्जत विधानसभा मतदार संघात विविध येणारे पोलनुसार उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार नितिन सावंत हे तीन नंबरवर जातील अशी सुरू असलेली चर्चा व अहवाल पाहाता अपक्ष घारे व महायुतीचे आमदार थोरवे यांच्यात मुख्य लढत होणार असल्याने बंडखोर याचा पराजय होण्या प्रति व शिवसेना उध्दव ठाकरे गटावर कोणतीही टीका टीपणी न करता व पक्षात राहून पक्षविरोधी असल्याचे आमच्यावर आरोप होऊ नये म्हणून आमचे सामुहीक राजीनामे देत आम्ही सुधाकर घारे यांना आमचा पाठिंबा देत असल्याचे माजी नगरसेवक तथा गट नेते प्रसाद सावंत व माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव यांच्यासह माजी नगराध्यक्षा, माजी नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे व पक्षश्रेष्ठी तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे मेलद्वारे आमचा सामूहिक राजीनामा पाठविल्याचे जाहीर केले होते.

या सामूहिक राजीनाम्याची दखल ही पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेत माजी नगरसेवक तथा गट नेते प्रसाद सावंत व माथेरान शहरप्रमुख कुलदीप जाधव यांच्यासह माजी नगराध्यक्षा, माजी नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक यांना मुंबई येथील मातोश्री येथे बोलावून सर्व पदाधिकाऱ्यांचा व शिवसैनिक यांचा राजीनामा नामंजूर केला असून पुढील निवडणुकीमध्ये कामास लागा असे सांगितले आहे. यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, किशोरीताई पेडणेकर, अनिल परब, विनायक राऊत व शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रसाद सावंत ही आपली हक्काची व्यक्ती असून त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असेही सांगितले आहे.
उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना गर्भित इशारा..
मिंधे गटाचे पक्षाशी गद्दारी केलेले विरोधी उमेदवाराचे नाव न घेता काहीही करून तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन पोपटाचा डोळा फोडा असा गर्भित इशारा मातोश्रीवरून ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला.
कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी निवडी बदल जो काही संभ्रम असल्याने, माथेरान मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा पदाधिकारी व शिवसैनिक यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने, आम्हाला पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी मातोश्रीवर बोलावून साहेब, व सेनेचे दिग्गज नेते यांनी आमचा संभ्रम दूर करत तुम्ही निष्ठावंत आहात तुम्ही निवडणुकीमध्ये कामाला लागा असे सांगितले आहे.
-प्रसाद सावंत,
माजी नगरसेवक, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद,
आमच्या राजीनाम्याची दखल घेत आम्हाला पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी मातोश्रीवर बोलवले व भरपूर वेळ देत आमच्याशी चर्चा करून, शिवसेनेनी निष्ठावंत उमेदवार दिला आहे. तुम्ही ही माथेरानचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात, माथेरान या आधी ही तुम्ही संभाळला आहे. व पुढे ही तुम्हाला संभाळायचे आहे. तुम्हाला निष्ठावंत उमेदवाराचे काम करायचे आहे. तुम्ही निवडणूकीच्या कामाला लागा असा साहेबांचा असलेला आदेश आम्ही शिरमात्र समजून आम्ही आज पक्षाचे काम करायला तयार आहोत.
-कुलदीप जाधव,
माथेरान शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे