• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दहिसरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला!

ByEditor

Oct 26, 2024

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देत भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी आज मातोश्रीवर जात एबी फॉर्म घेतला. यावेळी तेजस्वी यांचे सासरे आणि माजी आमदार विनोद घोसाळकरही होते. मातोश्रीवरुन तेजस्वी घोसाळकर यांनी ग्रीन सिग्नल देण्यात आलं आहे.

तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीमुळे दहिसरमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दहिसरमध्ये भाजपाच्या मनिषा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका असून त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रूवारी 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!